चला घेऊ या देशातील एकमेव भगवंताचे दर्शन

भारतातील एकमेव भगवंत मंदिर असलेल्या व जुन्या काळापासून “भगवंताची नगरी” म्हणून बार्शी ची ओळख आढळते. बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर हे विष्णु देवाचे मंदिर आहे.

या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील एकमेव विष्णु मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर बांधण्यात आले.तसेच संपूर्ण आशिया खंडातील हेमाड हया पाषाणामधील कोरलेले एकमेव मंदिर आहे.

मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे.गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणुक शहरातुन काढली जाते. प्रत्येक पुर्णिमेस छबीना बाहेर नेहण्यात येतो.

मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारो भावीक येतात.
सद्या आषाढी एकादशी पर्वकाळ सुरू झाल्याने विदर्भ मराठवाड्यातून शेकडो दिंड्या पंढरपूर कडे मार्गक्रमण करत आहेत.या दिंड्यांचा मुक्काम हा भगवंत मंदिरात असतो. या दिंड्यातील वारकऱ्यांनी मंदिर परिसर फुलून गेला आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: