सोलापूर शहर व जिल्ह्यात एकाच दिवशी 23 मृत्यू; 913 कोरोना बाधित रुग्णांची वाढ

सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेयआज दि.12 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 641 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे .एकाच दिवशी 9 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.तर शहरात 272 रुग्ण आढळले तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज सोमवारी 12 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 641 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 397 पुरुष तर 244 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 579 आहे. यामध्ये 367 पुरुष तर 212 महिलांचा समावेश होतो .आज 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 4571 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3930 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 52 हजार 551 इतकी झाली आहे. यामध्ये 32,835 पुरुष तर 19,676 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

सोलापूर शहर कोरोना रिपोर्ट

सोलापूर शहरात आज सोमवारी दि.12 एप्रिल रोजी कोरोनाचे नवे 272 रुग्ण आढळले असून यामध्ये 161 पुरुष तर 111 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 2278 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 2006 निगेटीव्ह तर 272 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 234 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

कोरोनामुळे आज 14 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: