23 लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महत्वाचा निर्णय

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबईत आज महाराष्ट्रातला कोरोनाचा पहिला बळी गेला आणि त्यानंतर खबरदारी म्हणून सरकारकडून कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी झाल्याशिवाय या आजारावर मात करण कठीण असल्यामुळे मुंबईतील लोकल सेवा आज कदाचित स्लो डाऊन करण्याचा विचार मंत्रिमंडळ बैठकीत केला जाऊ शकतो. अशै चर्चा आहेत. सध्या मुंबईतील रेल्वे स्टेशनवर नेहमीपेक्षा गर्दी कमी असली तरीसुद्धा सरकारकडून खचाखच भरणाऱ्या लोकलच्या बाबतीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

तसेच 23 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे-मुंबई निझामाबाद, नागपुर-मुंबई, पुणे-नागपुर, भुसावळ-नागपुर यासारख्या लांबपल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या 17 ते 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: