23 तारखेला भाजपचे पार्सल जिथुन आले तिथे परत पाठवते-सुप्रिया सुळे

खेड शिवापूर: मी तिसऱ्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून उभी आहे. प्रत्येकवेळी माझ्या समोर नवीन उमेदवार असतो. एकदा तो हरला की पुन्हा 4 वर्ष 11 महिने दिसत नाही. यांना जर खरोखर बारामती जिंकायची आहे, तर 5 वर्षे ग्राऊंडवर काम का करत नाहीत? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या बारामतीत आज एका महिलेच्या विरोधात सारे विरोधक एकवटले आहेत; पण चिंता करू नका 23 तारखेला यांचे पार्सल जिथून आले तिथे परत पाठवते, अशा शब्दात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणेचा समाचार घेतला.
माझ्यावर टीका करायला विरोधकांना मुद्दाच सापडत नसल्यामुळे त्यांची पातळी दिवसेंदिवस घसरत असल्याचा दावाही त्यांनी केला. बारामती लोकसभा मतदार संघातील नीरा आणि खेड शिवापूर येथे शुक्रवारी सुळे यांची प्रचार सभा झाली यावेळी त्या बोलत होत्या.

admin: