राज्यात 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन ? सर्वपक्षीय बैठक सुरू

महाराष्ट्रात गेल्या नऊ दिवसात म्हणजे एप्रिल महिन्यात आतापर्यंत जवळपास ४ लाख ७५ हजार लोकांना कोरोनाची लागण झालीय. रुग्णवाढ आणि राज्यातील परिस्थिती पाहता आरोग्य यंत्रणावर ताण वाढतोय. औषधसाठा कमी पडतोय. लसीकरण मोहिमेवरही त्याचा परिणाम दिसून येतोय.मुंबईत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वांची मते जाणून घेत राज्यात तीन आठवड्याचा लॉकडाऊन होण्याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. राज्यात कडक लॉक डाऊन लावावा अन्यथा 21 तारखे नंतर राज्यात विदारक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भूमिका प्रशासनाने मांडली आहे.

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठीच सरकारने कठोर निर्बंध लागू केले होते. तरीही रुग्णसंख्या काही कमी झालेली नाही.. तर दुसरीकडे या निर्बंधावरून व्यापारी वर्गामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीत कोरोनाची सद्यस्थिती, लसींचा साठा, निर्बंध शिथिल करायचे की आणखी कडक करायचे यावर विचारविनिमय केला जाईल. राज्यात लॉकडाऊनची मुदत वाढवावी आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी सूचना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे, तर सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडणारच, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: