२०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागेल; भाजपच्या या नेत्याचा इशारा

 

महाराष्ट्रात अलिकडेच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अध्यक्षपदाची एकही जागा पटकावता आली नाही. त्यांचे जास्त सदस्यही निवडून आले नाहीत. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपसाठी हा एक इशारा असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला हार पत्करावी लागू शकते, असा इशारा भाजपचेच माजी राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

ढासळत चाललेली अर्थव्यवस्था आणि सीमा क्षेत्रात चीनला गमावलेला भूभाग ही देखिल भाजपच्या विजयात अडसण ठरणारी कारणे असणार आहेत असे स्वामी यांनी म्हटले आहे. स्वामी यांनी याबाबतचे ट्‌वीट केले असून त्यासोबत एक व्हिडिओही जारी केला आहे. नागपूर हा भाजपचा बालेलिकल्ला मानला जातो.

नितीन गडकरी, देवेंद्र गडकरी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ज्या भागातून येतात तेथेच भाजपला शून्य जागा मिळणे ही मोठी बातमी आहे. भाजपला या पराभवाचे पोस्ट मार्टम करण्याची आणि दुरूस्ती करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. , त्यांनी आणखी एका ट्‌वीटमध्ये भारत आणि चीन, रशिया व अमेरिका या देशांशी असलेल्या संबंधात दरी निर्माण होत चालली असून पाकिस्तानचे या देशांशी संबंध सुधारत असल्याकडे लक्ष वेधले आहे. अमेरिका, चीन आणि रशियाने भारताला का नाकारले? त्यांनी पाकिस्तानला जवळ केले आहे असे स्वामी यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: