पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार सरकारी बोनस ; सोमवारी होऊ शकते घोषणा

पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार सरकारी बोनस होऊ शकते सोमवारी घोषणा

बृहमुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनस संदर्भात कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. ही भेट सकारात्मक झाल्याची बातमी आता समोर येत आहे. या बैठीकीला महापौर किशोरी ताई पेडेकर सुद्धा उपस्थित होत्या. त्यानुसार यंदाच्या दिवाळीला मनपा कर्मचाऱ्यांना १५ हजार बोनस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे आणि संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त आता समोर येत आहे.

मुंबई मनपा आयुक्त चहल आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बोनस संदर्भात बैठक पार पडली होती. परंतु या बैठकीत बोनस संदर्भात कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे बोनस संदर्भात मुख्यत्री ठाकरेच निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांची काल भेट घेतली होती.

पालिका कर्मचाऱ्यांना यंदा २० हजार बोनस देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मागील वर्षाच्या बोनस रकमेत कोणत्याही प्रकारची कटोती करू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कर्मचाऱ्यांना १५ हजार बोनस बोलण्याची शक्यता आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: