१५ दिवसांत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडणार; एक दिल्लीत अन् एक महाराष्ट्रात – सुप्रिया सुळे

 

पुणे | राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार भारतीय जनता पार्टीसोबत जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सासवड (जि. पुणे) येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करून ते मुंबईतच थांबले. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

काल दुपारनंतर अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याच्या चर्चेने जोर धरला. दिवसभर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाही त्यांनी चुप्पी साधल्याने चर्चेला बळच मिळाले. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी १५ दिवसांत दोन मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. यामधील एक दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात होणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंच्या या दाव्यानं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

सुप्रिया सुळे यांना आजित पवार कुठे आहे असे विचारण्यात आले. यावर ‘तुम्ही सर्व चॅनलवाल्यांनी अजितदादांच्या मागे एक युनिट लावावे. राज्यात अनेक समस्या आहेत, राज्यात चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अजित पवार भाजपासोबत जाणार का?, असा सवालही सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर ‘हे दादांनाच विचारा…मला गॉसिपसाठी वेळ नाही, लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे, त्यामुळे मला त्याची माहिती नाही, असं प्रतिउत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं.

 

Team Global News Marathi: