१५ दिवसांत धावपट्टी बांधून देतो’, नितीन गडकरींनी भर कार्यक्रमात हवाई दलाला शब्दच दिला

 

नवी दिल्ली | रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज राजस्थानच्या बाडमेर राष्ट्रीय हायवे-९२५ वर आपत्कालीन लँडिंग स्ट्रिपचं उदघाटन करण्यात आलं. देशात पहिल्यांदाच एका हायवेचा वापर भारतीय हवाई दलाकडून सशस्त्र विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी केला जाणार आहे. पण या कार्यक्रमात नितीन गडकरींनी एक घोषणा केली असून सर्वनाचे लक्ष वेधले आहे.

सशस्त्र दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी दीड वर्ष नव्हे, अवघ्या १५ दिवसांत आम्ही जबरदस्त धावपट्टी बांधून देऊ, असा शब्द नितीन गडकरी यांनी हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांना दिला आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये इमर्जन्सी लँडिंग फील्ड तयार करण्यासाठी सामान्यत: दीड वर्षांचा कालावधी लागतो असं मला भदौरिया यांनी सांगितलं. त्यांना मी सांगितलं की आम्ही तुम्हाला १५ दिवसांत उत्तम गुणवत्तेची धावपट्टी तयार करुन देऊ असं नितीन गडकरी कार्यक्रमात म्हणाले.

देशाच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयानं तीन विश्वविक्रमांची नोंद केल्याची माहिती देखील गडकरींनी यावेळी दिली. कोविड-१९ चं संकट असतानाही देशात दरदिवशी ३८ किमी लांबीच्या रस्त्याचं काम पूर्ण होत होतं. हे प्रमाण जगातील सर्वाधिक प्रमाण आहे. याशिवाय मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवेवर अवघ्या २४ तासांत २.५ किमी लांबीचा ४ लेनचा रस्ता आम्ही तयार केला. तर एका दिवसात विजापूर ते सोलापूरपर्यंत २६ किमीचा सिंगल लेनचा रस्ता तयार करण्याचा विक्रम केला आहे असं गडकरी म्हणाले.

Team Global News Marathi: