सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज ९०९ कोरोना संदर्भात वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी ८०३ अहवाल निगेटिव्ह आले असून १०६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात ५३ पुरुष तर ५३ महिलांचा समावेश होतो. आज १८० प्रलंबित अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज ४८ बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
आज नव्याने आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये कुमठा तांडा, मंगल विहार अपार्टमेंट जुळे सोलापूर, चंदननगर जुळे सोलापूर, जिल्हा कारागृह जेल रोड, सिंधु विहार जुळे सोलापूर, दाराशा मॅटर्निटी हॉस्पिटल लष्कर, गुरुदत्त हौसिंग सोसायटी गुरूनानक नगर, पश्चिम मंगळवार पेठ बुधले गल्ली, दत्तनगर सोलापूर, एमआयडीसी रोड, शनिवार पेठ, कुचन पोलिस क्वॉर्टर जवळ, सोमवार पेठ मारुती मंदिर जवळ,
सिद्धिविनायक नगर, म्हाडा कॉलनी डी-मार्ट जवळ, गरिबी हटाव झोपडपट्टी विजापूर नाका, विद्यानगर शेळगी, अंबिकानगर भाग क्रमांक चार, शिवाजी नगर बाळे, मार्कंडेयनगर कुमठा नाका, भिम नगर पूना रोड, संतोष नगर बाळे, मार्कंडेनगर कुमठा नाका, शशिकला नगर, यशोदीप अपार्टमेंट, रेल्वे लाईन, मारुती गल्ली बाळे, शंकर नगर होटगी रोड, बहरुपीनगर विजापूर रोड, गणेश नगर पूना रोड,
लक्ष्मीनगर बाळे, जोडभावी पेठ, भवानी पेठ, सिद्धिविनायकनगर सैफुल, मड्डी वस्ती कुमठे गाव, दाजी पेठ, श्रद्धा एम्पायरजवळ, नवी पेठ, सिद्धेश्वर गांधीनगर नई जिंदगी, जुना विडी घरकुल, जानकी नगर जुळे सोलापूर, स्वामी विवेकानंद नगर हत्तुरे वस्ती, हरेकृष्ण विहार विजापूर रोड, बालाजी सोसायटी कुमठा नाका, आसरा हाउसिंग सोसायटी, अश्विनी हॉस्टेल आसरा चौक,
लक्ष्मीनगर, यल्लालींग मठ अक्कलकोट रोड, कर्णिकनगर जिजामाता उद्यान, सहारा नगर, मुरारजी पेठ, सिद्धेश्वर पेठ स्टेट बॅंकेच्या मागे, दत्त मंदिर जवळ दाजी पेठ, गणेश नाईक प्रशाले जवळ, राजस्व नगर विजापूर रोड, वर्धमान नगर रुपाभवानी रोड, लक्ष्मी बॅंक कॉलनी जुळे सोलापूर, संकेत थोबडे नगर, व्हीआयपी रोड जवळ या भागात आज नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत