१०० व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील – किशोरी पेडणेकर

 

मुंबई | शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देशाच्या १०० व्या स्वातंत्र्य दिनी दिल्लीत ध्वजारोहण करतील असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.

किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, आज शिवसेना भवनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याआधी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 50 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना भवनात ध्वजारोहण करण्यात आले होते. आता पुढे देशाचा 100 वा स्वातंत्र्य दिन असेल तेव्हा आदित्य ठाकरे हे दिल्लीतून येऊन झेंडावंदन करतील, असा विश्वास किशोरी पेडणेकरण यांनी व्यक्त केला.

देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव करत असताना देशात अडचणीदेखील तेवढ्याच असल्याचेही त्यांनी सांगितले. किशोरी पेडणेकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. महिलांना सक्षम करण्यासाठी संसदेत आणि विधीमंडळात महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी त्यांनी केली. घराणेशाहीबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, घराणेशाहीबाबत फक्त ठाकरेंवर निशाणा का साधताय असा प्रश्न त्यांनी केला. भाजपमध्येही नेत्यांच्या मुलीला, मुलाला संधी मिळत असल्याकडे पेडणेकर यांनी लक्ष वेधले.

Team Global News Marathi: