….ह्या सर्व गोष्टी बघून मला धक्काच बसला – उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना संबोधित केले आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये मिळाव्यात म्हणून राज्य सरकारने धाडसी निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

सरकारच्या नवीन नियमानुसार आता जीवनावश्यक वस्तुंची दुकाने 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जास्त वेळ घरातच बसून राहणे आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हंटल आहे. राज्यातील नागरिक ज्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांची व्यवस्था तिथेच करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

काही नागरिक आपआपल्या घरी परतण्यासाठी ट्रक आणि टॅंकरमधून प्रवास करत आहे. ह्या सर्व गोष्टी बघून मला धक्काच बसला असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हंटल आहे. तसेच नागरिकांनी पोलिसांसोबत हुज्जत घालू नये. पोलीस हे आपल्या संरक्षणासाठी असतात त्यांचे सुद्धा परिवार कुटुंबे आहेत.

मी अनेक वेळा बघितलं की पोलीस कुटुंबियातील लहान मुले त्यांच्या वडीलांना म्हणत असतात. बाबा नको ना घराबाहेर जाऊ बाहेर कोरोना आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे नागरिकांनी ऐकायला पाहिजे पोलीस आपल्या भल्यासाठीच असतात असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हंटल आहे.

कोरोनाच्या थैमानामुळे राज्यात सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनाची माहिती देण्याबरोबरच राज्यातील नागरिकांच्या मनातली भीतीसुद्धा दूर करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने करतांना दिसून येत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: