हे आहेत सोलापूरचे रियल हीरोज,जळत असलेल्या बस मधून प्रवाशांना काढले बाहेर

सोलापूर: आज पहाटे चार वाजता सोलापूर पुणे महामार्गावर एसटी आणि बॅटरीने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला,त्यानंतर एसटी ने पेट घेतला, पण या धाडसी आणि जांबाज सोलापूरच्या युवकांनी पेटत्या एसटी बस मध्ये चढून सर्व प्रवाशांना बाहेर काढले आणि सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले.
अमीर मुलाणी, आकाश सरवदे, तुषार शिंदे, नितीन भोसले, सागर देडे आणि पवन बनसोडे, अशी या युवकांची नावे आहेत.

अशी घडली होती घटना

आज पहाटेच्या वेळेस तेलंगणा परिवहनच्या बसमधील १८ प्रवाशी गाढ झोपलेले असताना हा दुर्दैवी प्रसंग घडला.

अचानक बसने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. समोरचा ट्रक बॅटरी वाहतूक करणारा असल्याने त्यातील असंख्य बॅटऱ्यांचा स्फोट झाला अन् प्रवासी वाहतूक करणाऱ्या तेलंगणाच्या बसला आग लागली. सगळीकडे आग आणि धुरांचे लोट.. बसमध्ये अडकलेले प्रवाशी जिवाच्या आकांताने मदतीसाठी हाक देत होते. हा आक्रोश ऐकला हायवे नजीकच्या गावातील विद्यापीठातील आणि व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलेल्या युवकांनी…. मग त्यांनी लगेच धाव घेतली पण, दरवाज्याच्या बाजूने आग लागलेली होती, त्यामुळे आपला जीव धोक्यात घालत या युवकांनी अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बसच्या काचा फोडल्या अन् आपत्कालीन दरवाजा तोडून जखमींचे प्राण वाचवले..

कुठलीही शासकीय यंत्रणा मदतीला नसताना या युवकांनी केलेली मदत लाख मोलाची ठरली.अपघातानांतर या ६ युवकांनी मदत केली नसती, तर अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असती. अपघातग्रस्तांना मदत करा अन् माणुसकीचे दर्शन घडवा, असा संदेश सोलापूरकरांनी या निमित्ताने दिला आहे.

admin: