प्रवीण कसपटे यांना प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार

बार्शी:महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा  द प्राइड ऑफ इंडिया हा पुरस्कार बार्शी चे युवा उद्योजक  प्रवीण नवनाथ कसपटे यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.  पणजी येथील दिनानाथ मंगेशकर कला ॲकॅडमी येथे आयोजित या कार्यक्रमास पंतप्रधान मोदी यांच्या भगिनी वासंती बेन मोदी ,माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड.रमाकांत खलप ,गोवा राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर नाईक गावकर हेही उपस्थित होते माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आवाहन केले समाजातील विविध घटकांमध्ये अनन्यसाधारण काम करणाऱ्या व्यक्तींची देशभरातून निवड केली जाते व त्यातून हा पुरस्कार दिला जातो ज्यामुळे त्यांच्या कामाला उत्तेजना मिळते आणि जबाबदारीही वाढते असे डॉ प्रमोद सावंत यांनी नमूद केले. हा पुरस्कार घेण्यासाठी बार्शीतील त्यांचे सहकारी मित्र ॲड. विक्रम सावळेॲड. विकास जाधव माणिक  हजारे आणि ॲड विजय नवले हेही उपस्थित होते.

admin: