मुंबई । राज्यात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्ता स्थापनेचा तिढा आता सुटण्याची चिन्हे आहेत.गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात बैठकांचा जोर वाढला आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत राज्यात सरकार स्थापन करण्याविषयी सकारात्मक चर्चा झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. सत्तास्थापनेचा पेच सुटत असल्याने आता संभाव्य मंत्रीमंडळाविषयी चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रात स्थापन होणाऱ्या सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची यादी ग्लोबल न्यूजच्या हाती लागली आहे. पाहूयात कोण आहेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संभाव्य मंत्री…
शिवसेना –
१) एकनाथ शिंदे
२) सुभाष देसाई
३) सुनिल प्रभु
४) दीपक केसरकर
५) गुलाबराव पाटील
६) अनिल परब
७) गोपीकिशन बजोरीया
८) उदय सामंत
९)तानाजी सावंत
१०) संजय राठोड
११) आशिष जयस्वाल
१२) अर्जुन खोतकर
१३) दिवाकर रावते
१4) शंभूराजे देसाई
राष्ट्रवादी –
१) अजित पवार
२) जयंत पाटील
३) दिलीप वळसे पाटील
४) छगन भुजबळ
५) धनंजय मुंडे
६) नवाब मलिक
७) जितेंद्र आव्हाड
८) हसन मुश्रीफ
९) राजेश टोपे
१०) अनिल देशमुख
११) मकरंद पाटील
कॉंग्रेस-
१) बाळासाहेब थोरात
२) अशोक चव्हाण
३) पृथ्वीराज चव्हाण
४) विजय वड्डेट्टीवार
५) यशोमती ठाकूर
६) सतेज पाटील
८) के सी पाडावी
९) विश्वजित कदम
१०) सुनिल केदार
११) नितीन राऊत
१२) नाना पाटोले
१३) अमित देशमुख
या संभाव्य मंत्र्यांच्या नावाची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेचे सभापती पद मिळण्याची ही शक्यता आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस कडे उपसभापती पद जाईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.