मुंबई : भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीने हसीन जहांने इंस्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे सगळेच हैराण झाले आहेत. या फोटोत तिच्या सोबत मोहम्मद शमी असल्याचा दावा तिने केला आहे. या फोटोवरून शमीवर त्याचे चाहते भडकले आहेत. या फोटोवर खूप लोकांनी कमेंट केले आहेत.
हसीनने या फोटोसोबत शमीला एक मॅसेज देखील लिहिला आहे. तिने लिहिलं आहे की,’कल तू कुछ नही था तो मै पाक थी, आज तू कुछ बन गया तो मैं नापाक हो गई. झूठ बुर्खा डालकर बेपर्टा सच को मिटा नहीं सकता. मगरमच्छ के आंसू कुछ दिनों का ही सहारा होते है. यासोबत तिने लिहिलं आहे की, क्रिकेटर शमी अहमदसोबत.’
महत्वाची बाब म्हणजे शमी आणि हसीन गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहत आहेत. हसीन जहां आणि मोहम्मद शमीमध्ये वाद सुरू आहेत. हसीन जहांने शमीवर अनेक आरोप केले असून आता हे दोघे वेगळे राहत आहेत. या दोघांना एक मुलगी देखील आहे.
या फोटोवर हसीनने लोकांना वाईट पद्धतीने ट्रोल केलं आहे. काही लोकांनी तिची तुलना थेट दीपक कलालशी केली आहे, तर काही जणांनी हे फोटो हटविण्यास सांगितले आहेत.
विशेष म्हणजे हसीन जहां आणि मोहम्मद शमी यांच्यातील वाद २०१८ सालीच जगासमोर आले होते. आता दोघांमध्ये घटस्फोटाची लढाई सुरू आहे. शमीच्या आयुष्यातील सर्वात मोठे वादळ २०१८ मध्ये आले, जेव्हा त्याची पत्नी हसीन जहां हिने त्याच्यावर घरगुती हिंसाचार आणि व्यभिचाराचे आरोप केले होते. आयपीसी कलम ४९८ अ अन्वये घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली शमीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या प्रकरणी कोर्टात खटला सुरु आहे.