हर्षवर्धन पाटलांचं भाषण ऐकून वाईट आणि आश्चर्य ही वाटले : सुप्रिया सुळे

पुणे : काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सनसनाटी आरोप केले. पण या आरोपाबद्दल आपल्याला वाईट वाटल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

हे भाषण ऐकल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना फोन केला, पण फोन लागला नाही. त्यामुळे एका जबाबदार व्यक्तीकडे निरोप दिला आहे, माझा निरोप त्यांच्यापर्यंत जाईल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हर्षवर्धन पाटलांनी पुढील राजकीय वाटचाल ठरवण्यासाठी इंदापुरात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर आणि पवारांवर दगाबाजी केल्याचा आरोप केला.

2009 ला उमेदवारी मागे घे असं सांगण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन केला. नंतर एक फोन करुन उमेदवारी मागे घेऊ नको, असं सांगितलं. हेच का राष्ट्रवादीचं राजकारण, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला होता.

हर्षवर्धन पाटलांच्या आरोपांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाषणाबद्दल वाचून,ऐकून खूप वाईट वाटलं आणि आश्चर्यही वाटलं. कारण, इंदापूरच्या जागेबाबत अजून चर्चाही झालेली नाही. तीन ते चार दिवसांपूर्वी गणपती दर्शनाच्या निमित्ताने भेट झाली होती. भाषणानंतर मी फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन आजही लागत नाही.

त्यामुळे एका जबाबदार व्यक्तीकडे निरोप दिलाय. त्यांनी एवढी टोकाची भूमिका घेतल्याबद्दल आश्चर्य वाटलं. पवार साहेब आणि मी निवडणूक असो किंवा नसो, कायम गाठीभेटी घेत असतो. आम्ही 20014 ला वेगळे लढलो, 2009 ला मी स्वतः प्रचाराला गेले होते आणि यावेळी अजून जागांची चर्चाही झाली नाही,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: