स्वर्गीय आईचा शब्द न पाळणारे मतदारांशी काय प्रामाणिक राहणार – बजरंग सोनवणे

स्वर्गीय आईचा शब्द न पाळणारे मतदारांशी काय प्रामाणिक राहणार – बजरंग सोनवणे

केज -ज्यांनी स्वतःच्या स्वर्गीय आईने दिलेला शब्द सत्तेसाठी पाळला नाही ते मतदारांशीच काय भाजपाशी काय प्रामाणिक राहणार असा सवाल करत जे आधी पासूनच आतून भाजपचे होते ते आज उघड गेले तर नवल काय ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष यांनी मुंदडा परिवाराच्या भाजपा प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

जिल्हापरिषद निवडणूकीत तत्कालीन राष्ट्रवादीच्या नेत्याने राष्ट्रवादीचा उमेदवार पाडण्यासाठी केलेल्या फोनच्या रेकाॅर्डिंग उपलब्ध आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत कोणी कधी हात वरी केला ते ज्ञात आहे, लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याविरोधात केलेल्या पोस्ट आहेत, लोकसभा प्रचारा दरम्यान केलेली भाषणे कोणत्या आशयाची होती त्याचे व्हिडीयो आहेत, मतदाना दिवशी अंबाजोगाईत काय झाले हे पाहिले, २३ मे रोजी लोकसभेचा निकाल पूर्णपणे जाहीर झाला ही नव्हता तोच दुपारी इफ्तार पार्टीचे निमंत्रण जात होते.

राष्ट्रवादीच्याच विधानसभेच्या उमेदवारातर्फे राष्ट्रवादीचा पराभव झाल्याच्या खुशीत दुसर्या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन केले असावे का? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभेचा निकाल लागून महिना पण झाला नव्हता तोच मतदारसंघातील कार्यक्षम पदाधिकार्यांचे द्वेशापोटी राजीनामे घेतले व नवनियुक्त्या केल्या. त्यानंतर झालेल्या पंचायत समिती पोटनिवडणूकीत उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी हे नवनियुक्त पदाधिकारी किंवा त्यांचे नेते उपस्थित का नव्हते? हा प्रश्न कोणी विचारणार नाही पण उगाच माहिती न घेता मॅनेज झाल्याचे आरोप करायचे. मा.जयंत पाटील साहेबांच्या आदेशानुसार ती जागा काॅंग्रेसला सोडण्यात आली अन् त्यासाठी तुम्ही जिल्हाध्यक्षांना दोषी ठरवता? आपली आमदारकी वाचवण्यासाठी मागील अनेक वर्षापासून कोण कोणासोबत तडजोडी करत होत हे सामान्यांना माहित नसेल पण जाणकारांना नक्की माहित आहे असे सोनवणे म्हणाले.

मुद्दा असा आहे की यापुढे पक्षात राहून विरोधकांसोबत तडजोडी करायला जमणार नाहीत व केल्यातर त्या तडजोडी उघड्या पडतील याची पूर्ण कल्पना त्यांना आली होती म्हणूनच ते भाजपात गेले असे सोनवणे म्हणाले.

पवार साहेब बीड येथे आले त्याअगोदरच्या रात्रीच विरोधकांसोबत चर्चा झाल्या होत्या. जर विरोधी पक्ष नेत्यांचा व जिल्हाध्यक्षांचा यांच्या उमेदवारीला विरोध असता तर यांनी त्याचदिवशी शिवछत्र येथे झालेल्या बैठकीत पवार साहेबांना आपला नकार का कळवला नाही? आभाळाऐवढा माणूस ज्यांना आपण दैवत मानतो, जे सध्या या वयात हूकुमशाही विरोधात लढत आहेत, त्यांनी जाहीर सभेत तुमच्या पाठीवर हात ठेवत आशिर्वाद दिला अन् त्यांच्याच डोळ्यात तुम्ही नंतर पाणी आणले? ही कसली निष्ठा? जाणत्या राजाचा यात काय दोष होता? त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला ही त्यांची चूक ठरली का? असा सवाल केला आहे.

पवार साहेब व आजवर भाजपसाठी कष्ट घेतलेली निष्ठावंत मंडळी हा निर्णय कदापी सहन करणार नाही याची मला खात्री आहेच.


असो, यापूढे केज मतदारसंघातील तरुणांनी यांचा आदर्श न घेता आपापल्या आईला दिलेला शब्द पाळावा व दैवताने दिलेल्या आशिर्वादाचा सन्मान राखत त्यांना दुखवू नये हीच अपेक्षा असा टोला ही सोनवणे यांनी लगावला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: