सोलापूर शहर – जिल्ह्यात 836 जण बरे झाले 680 वर उपचार सुरू ; आज 47 पॉझिटिव्ह

सोलापूर शहर – जिल्ह्यात 836 जण बरे झाले 680 वर उपचार सुरू ; आज 47 पॉझिटिव्ह

सोलापूर -सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1659 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 143 वर गेली आहे. सध्या जिल्ह्यात 680 जणांवर उपचार सुरू आहेत तर 836 जण बरे झाले आहेत.

सोलापूर शहरात आज 136 अहवाल प्राप्त झाले यात 95 निगेटिव्ह तर 41 पॉझिटिव्ह असून यात 26 पुरूष आणि 15 महिलांचा समावेश आहे. आज 6 मृत असून यात 4 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे. 21 जण बरे झाल्यानं घरी परतले.

शहरात आत्तापर्यत 1543 पॉझिटिव्ह रूग्ण मिळालेत. त्यात 923 पुरूष तर 620 महिलांचा समावेश आहे. शहरात एकूण मृत 133 असून यात 83 पुरूष आणि 50 महिलांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 420 पुरूष आणि 382 महिला असे 802 जण बरे होवून घरी परतले आहेत तर सध्या 420 पुरूष आणि 188 महिलांवर उपचार सुरू आहेत.

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 81 अहवाल प्राप्त झाले यात 75 निगेटिव्ह तर 6 पॉझिटिव्ह आणि 6 मृतांचा समावेश आहे. 1 रूग्ण बरा झाला. ग्रामीणमध्ये एकूण 116 पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत मिळाले असून यात 72 पुरूष आणि 44 महिलांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये आत्तापर्यंत 10 मृत झाले असून यात 6 पुरूष आणि 4 महिलांचा समावेश आहे. तर 22 पुरूष आणि 12 महिला असे 34 जण कोरोनातून बरे झाले आहेत तर 44 पुरूष आणि 28 महिला अशा एकूण 72 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ग्रामीणमध्ये आज जे मृत पावले त्यात मौलाली गल्ली अक्कलकोट येथील 60 वर्षीय पुरूष. मौलाली गल्ली अक्कलकोट मधीलच 43 वर्षीय महिला. मुळेगांव दक्षिण सोलापूर येथील 71 वर्षीय पुरूष. होटगी दक्षिण सोलापूर येथील 70 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे. जिल्ह्यात करमाळा आणि मंगळवेढा वगळता इतर सर्व तालुक्यात कोरोनाचे रूग्ण मिळाले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: