सोलापूर जिल्ह्यात 792 जण बरे झाले तर 490 जणांवर उपचार सुरू
सोलापूर - सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1310 इतकी झाली असून मृतांची संख्या 122 आहे. सद्यस्थितीत सोलापूरात 429 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर 759 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज शहरातील 362 अहवाल प्राप्त झाले यात 320 निगेटिव्ह तर 42 पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये 23 पुरूष आणि 19 महिलांचा समावेश आहे. आज 2 पुरूष आणि 1 महिला असे तिघेजण मृत पावल्याची नोंद आहे. आज एकूण 49 जण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. आज मृत झालेल्या व्यक्ती सर्वोदय सोसा. पुरूष वय 89, भारतरत्न इंदिरा नगर पुरूष वय 63. रामराज्य शेळगी परिसर महिला वय 67.
सोलापूर ग्रामीण मधील कोरोनाबाधितांची संख्या 100 इतकी झाली आहे तर मृतांची संख्या 6 आहे. ग्रामीणमध्ये आज 45 अहवाल प्राप्त झाले यात 27 निगेटिव्ह तर 18 पॉझिटिव्ह अहवाल आलेत त्यात 9 पुरूष आणि 9 महिलांचा समावेश आहे. आज एकही मृत नाही. सध्या ग्रामीणमध्ये 61 बाधितांवर उपचार सुरू आहेत तर 33 जण बरे होवून घरी परतले आहेत. आज जे रूग्ण मिळाले त्यात पारधीवस्ती मुळेगांव, नवीन विडी घरकुल दक्षिण सोलापूर, भोजप्पा तांडा कवठे, मौलाली गल्ली अक्कलकोट येथील रूग्णांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1410 वर पोहोचली आहे तर मृतांची संख्या 128 इतकी आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 792 रूग्ण बरे होवून घरी परतले तर 490 जणांवर उपचार सुरू आहेत.