सोलापूर रेल्वेस्थानकावर उभारले हेल्थ ए.टी.एम. सेंटर; ५० रूपयांत होणार या प्रकारच्या चाचण्या….

सोलापूर : प्रवासाला निघताना अस्वस्थ वाटतंय, किंवा घाईघाईत आरोग्याच्या काही तपासण्या राहून गेल्या अथवा अगदी सहज म्हणून आपल्याला आरोग्य तपासण्या करायच्या असतील तर ती सुविधा आता सोलापूर रेल्वे स्थानकावरच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर हेल्थ ए.टी.एम. सुरू करण्यात येणार आहे.

अवघ्या ५० रूपयात १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या सोलापूर रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ या ए.टी.एम.चा लाभ सोलापूरसह संपूर्ण देशभरातील कोणताही नागरिक घेऊ शकतो असेही मध्य रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले.सोलापूर जंक्शन हे सोलापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे मुख्यालय येथेच असून सोलापूर हे भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. सोलापूर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कुडुर्वाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई -चेन्नई, सोलापूर – विजापूर व मिरज – लातूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, भुबनेश्वर, बेंगलोर, हैदराबाद ही अनेक शहरे रेल्वेद्वारे सोलापूरला जोडली गेली आहेत. हे रेल्वेदृष्ट्या दक्षिणेचे प्रवेशद्वार आहे.

या स्थानकावर दररोज हजारो प्रवाशी ये-जा करतात़ आता येणार्या प्रत्येक प्रवाशांच्या आरोग्याची काळजी रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत आहे़ अवघ्या ५० रूपयात १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.- मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकावर उभारण्यात आलेल्या हेल्थ ए.टी.एम. सेंटरमध्ये अवघ्या ५० रूपयात १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत़ हाडांचा मास, बॉडी मास इंडेक्स, बी.पी., मेटाबोलिक एज, बॉडी फॅट, हायड्रेशन, पल्स रेट, उंची आदी १६ प्रकारच्या चाचण्या या हेल्थ ए.टी.एम. सेंटरवर करण्यात येणार आहेत़ ही तपासणी देशभरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार आहे़ ही सेवा खासगी एजन्सीमार्फत पुरविण्यात येत असल्याचेही रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: