ग्लोबल न्युज न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असताना करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असे दिसत असून एकेकाळी शरद पवार यांचे विश्वासू असणारे माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री स्व.दिगंबरराव बागल यांच्या कन्या , राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्य रश्मी दीदी बागल ह्या शिवसेनेत जाण्याच्या अंतिम टप्प्यावर आल्या आहेत.”
राजकीय चाणक्य घुमरे सर यांची खेळी
2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात काही कारणास्तव दूर गेलेले ‘काका’ आता रश्मी बागल यांची रणनीती सांभाळत आहेत. राजकीय चाणक्य विलासराव घुमरे सर यांच्या चेकमेट चालीनुसार उद्धव ठाकरे यांचे विश्वासू, नुकतेच कॅबिनेट मंत्री झालेले प्रा.तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून रश्मी बागल यांच्या शिवसेनेचा मार्ग सुखकर झाला आहे.तसेच या शिवसेना प्रवेशाला नुकतेच मंत्री तानाजी सावंत यांनी विद्यमान आमदार नारायण पाटील यांना दिलेल्या अप्रत्यक्ष इशाऱ्याची देखील किनार आहे.
राष्ट्रवादीचे पक्षनेतृत्व कामाची कदर करत नसल्याने पक्ष सोडणार असल्याचे रश्मी यांनी सांगितले,शिवसेना प्रवेश करण्या अगोदर बागल येत्या सोमवारी (ता. 19) रश्मी यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत पुढील माहिती देतील असे दिग्विजय बगल यांनी सांगितले.
तर रश्मी बागल यांच्या सोशल मीडिया सेल ने शिवसेना प्रवेशाचा अधिकृत दुजोरा देणारा पुढील प्रमाणे मेसेज आज प्रसारित केला आहे.
शिवबंधन हाती बांधण्याची वेळ आली आहे. याविषयीची सविस्तर चर्चा झाली असून शिवसेना आपल्याला तिकीट द्यायला तयार आहे. यावर रश्मी दिदींना अनुमती देण्यासाठी बागल गटावर प्रेम करणाऱ्या, खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या, निष्ठावान आणि प्रामाणिक पणे कोणत्याही परिस्थितीत बागल गटाला साथ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सोमवारी दिनांक १९/८/२०१९ रोजी सकाळी १० वाजता बागल संपर्क कार्यालयात यावे. सर्वांना ही नम्र विनंती आहे.
रश्मी बागल यांचा शिवसेना पक्ष प्रवेश 20 ऑगस्ट ला होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.