बार्शी: सोपल कुटूंबच मूळ संतनाथ नगरी अर्थात वैरागचे असून आजही इथ सोपल कुटूंब असून ते संतनाथ महाराजांचे मानकरी आहेत. लायकी नसणार्यांनी वैराग तालुका निर्मितीचे व वैराग भागाच्या विकासाची आश्वसने देऊ नयेत असा टोला शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांनी राऊतांना नाव न घेता लगावला.
वैराग (ता.बार्शी) येथे बुधवारी (ता.16) आयोजित प्रचार सभेत सोपल बोलत होते. यावेळी व्यासपीठार महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सह अध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अरूण कापसे, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात, माजी सभापती मकरंद निंबाळकर, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रवीण काकडे,अरूण सावंत, युवा नेते आर्यन सोपल, उज्वला जाधव, मंदा काळे, मंगल पाटील, संतोष गणेचारी उपस्थित होते.
वैरागची अस्मिता आजच कशी सुचली असा सवाल करत सोपल म्हणाले,काम करणे हाच आमचा धर्म आहे 1988 पासून वैराग भागाची विकास कामे केली आहेत. मागील 24 वर्षापासून इथल्या आठवणी माहित आहेत. केवळ विरोधकाने लक्ष्मी दर्शन दिल्यानेच राष्ट्रवादीचे उमेदवार भूमकर त्यांच्या विरोधात बोलत नाहीत. घडळ्याची व अपक्षाची नुरा कुस्ती आहे असा आरोप केला. भूमकरांचे नाव न घेता तु आमच्या तालमीतलाच आहेस पण वस्तादाचा डाव अजून राखीव आहे हे लक्षात ठेव.
ज्यांच्याकडे भांडवल नाही ते वैराग तालुका होऊ नये म्हणून विरोध केला असा आरोप करत आहेत संतनाथाची शपथ अस काहीही केलेले नाही असे स्पष्ट करत सोपलांनी राऊतांच्या वैराग तालुका निर्मितीच्या विरोधाच्या वक्त्यव्याचा यावेळी चांगलाच समाचार घेतला.
यावेळी मिरगणे म्हणाले वैराग भागाला पाच वर्षात पाणी आणले नाही तर तोंड दाखवणार नाही. मराठवाड्याला जाणार्या 167 पैकी 12 टीएमसी पाणी बार्शी तालुक्याला मिळवणार. आमची संस्कृती सुसंस्कृत आहे. राक्षासाला मातीत घालण्याची आहे. मी विकासाची भाषा वापरतो तर विरोधक गलिच्छ भाषा. तुमच्यावर संस्कार करण्यात पालक कमी पडले असा टोलाही राऊतांचे नाव न घेता मिरगणे यांनी यावेळी लावला. तसेच लवकरच तेलगिरणी चौकातून विरोधकाच्या त्या वक्तव्यचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाऊसाहेब आंधळकर, कापसे, मकरंद निंबाळकर यांची भाषणे झाले. सूत्रंसचालन आनंद गवळी व अश्विनी बुडूख यांनी केले. सभेसाठी सुरेश अडसूळ, विजय देशमुख, बार्शी बाजार समितीचे संचालक साहेबराव देशमुख, सुरेश पंके, वर्षकेतू जाधव उपस्थित होते.