सेवानिवृत्त DYSP अशोक शेजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

सेवानिवृत्त DYSP अशोक शेजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

माळशिरस :- सध्या कोरोनो या रोगामुळे संपूर्ण जग संकटात आहे,या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गोरगरीब संकटात सापडले आहेत.ठिकठिकाणी समाजसेवक त्यांना मदतीचा हात देत आहेत आहे.


सेवानिवृत्त DYSP अशोक शेजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील दत्तनगर व निमगावपाटी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने व उद्योजक श्री.तुकाराम काळे,मगन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री.तुकाराम काळे म्हणाले की,ज्यांची चांगली परिस्थिती आहे अशा सर्वांनी आपल्या जवळच्या गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करावा व सढळ हाताने मदत करावी.
यावेळी माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर सुरेश सुरवसे,अतुल पिसे,समाधान काळे,आहिल पठाण व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

admin: