सुमित्रा महाजन महाराष्ट्राच्या राज्यपाल होण्याची शक्यता

मुंबई : विद्यमान राज्यपाल विद्यासागर राव यांची येत्या काही दिवसात मुदत संपत असतानाच लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची त्यांच्या जागी नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राव यांची अन्य एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यचता आहे..महाजन या मूळ महाराष्ट्रातील असल्या तरी त्यांची कर्मभूमी मध्यप्रदेशातील इंदूर राहिली आहे. इंदूरमधून त्या लोकसभेवर निवडून येत असत.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून त्यांनी स्वत:हून माघार घेतली होती. वय लक्षात घेता त्यांनी थांबावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी कळवले होते. त्यांना आता महाराष्ट्राच्या राज्यपाल करण्यात येणार असल्याची समजते.

admin: