सुप्रियाताई सक्षणा सलगर ला जरा आवरा-अजित पवारांचा सल्ला

बारामती- साहेब असताना सक्षणा या लोकांबद्दल असं बोलत होती हे योग्य नाही. त्यामुळे आपली भारतीय संस्कृती जपून, थोड तारतम्य बाळगून बोलावं असे सांगत सक्षणा सलगरला भर सभेत अजित पवार यांनी सुनावलं. ते देशाचे पंतप्रधान आहे त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणं योग्य नाही, सुप्रिया ताई सक्षणाला जरा आवरा असे ही ते यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना भर प्रचार सभेत अजित पवार यांनी झापल्याचा प्रकार घडला आहे. सक्षणा तू जरी ग्रामीण भाषेत बोलत असली तरी असे बोलणे योग्य नाही असे ही दादा म्हणाले.बारामतीच्या प्रचार सांगता सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यासह इतर नेत्यांचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी अजित पवार यांनी भर सभेत सक्षणा सलगर यांना खडसावले आहे.सक्षणा सलगर या आक्रमक भाषणामुळे राज्यात चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत.

admin: