मुंबई । शिखर बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी शरद पवार, अजित पवारांसह तब्बल 70 जणांवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी राष्ट्रवादीचे संस्थापक दस्तुरखुद्द शरद पवारांचं नाव आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी आंदोलने केली, बंद पुकारला. यानंतर पवारांनी स्वत:च एका पत्रकार परिषदेत मी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं सांगितलं.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एकामागून एक अनेक ट्विट्स करण्यात आले आहेत. ‘मी येतोय हुकूमशहांना जाब विचारण्यासाठी’ असे पोस्टरही ट्विट करण्यात आले आहे. खुद्द शरद पवारांनीही आपण उद्या ईडी कार्यालयात जाणार असल्याच्या बातमी ट्विटच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केलं आहे.
“काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे.
सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे.” मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार…
तुमच्या महाराष्ट्र घडवताना च्या वेदना आम्ही बघितल्या आहेत कर्क रोग मांडी च्या हाडाचे ऑपरेशन पायाला झालेली इजा तरी तुम्ही लढताय
वय वर्ष 79 हे सगळे तुम्ही आमच्या साठी सोसलय
उद्या साठी माफ करा साहेब, यावेळेस पहिल्यांदा तुमचे ऐकणार नसल्याचे ट्विट केले आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.