साहेबांच्या तसेच दादांच्या शब्दाला कायम विशेष मान देणाऱ्या राजन मालकांचा आज वाढदिवस !

राजन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगा अजिंक्यराणा पाटील त्यांच्याविषयी म्हणतात सत्तेपेक्षा….

ग्लोबल न्यूज नेटवर्क: मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष राजन पाटील यांचा आज वाढदिवस.

त्यानिमित्ताने त्यांचे कनिष्ठ चिरंजीव राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी फेसबुक वर त्यांच्या व्यक्तीमत्व उलगडून दाखवले आहे.

‘आज दादांचा म्हणजे तुमच्या सर्वांच्या लाडक्या राजनजी मालकांचा वाढदिवस’

दादांचा वाढदिवस आजच्या दिवशी असतो मात्र त्यांनी कधी वाढदिवस साजरा केला नाही. रोजच्या दिवसाप्रमाणेच त्यांचा आजचा दिवस असतो. राजकारणात-समाजकारणात वावरत असताना अण्णांनी दिलेली शिकवण हलक्या कानाने ऐकू नका आणि उघड्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय विश्वास ठेवू नका. हे दादा स्वतः पाळून आहेत पण आम्हा भावंडांना ही अण्णांची ही शिकवण अंगीकारून दिली आहे.

रोज संध्याकाळी सहकुटुंब एकत्र जेवण करायचं हा त्यांनी कुटूंबाला आदर्श त्यांनी घालून दिला आहे, जेणेकरून प्रत्येकाशी मनसोक्त संवाद साधता येतो. रोज कितीही काम असलं किंवा अन्य कुठं ही व्यस्त असले तरी रोज नित्यनियमाने शेतात जाऊन येण्याचं दादा कधीही विसरत नाहीत. शेतातील प्रत्येक गोष्टीकडे स्वतःहून पाहणी करून देखरेख करत असतात.

दौऱ्याच्या निमित्ताने मी बाहेर असेल किंवा आम्हा भावंडांपैकी कोणी बाहेर असेल तर रोज विचारपूस करत हालचाल घेत असतात. मी दौऱ्यावर असल्यास आवर्जून फोन करून सांगतात, इथे गेल्यास अमुक अमुक व्यक्तीस किंवा त्यांच्या कुटूंबाला भेट. आणि त्यांनी केलेलं हेच मार्गदर्शन मला आयुष्यात मोठ्या प्रमाणात प्रेरित करत गेले. राजकारणात वावरत असताना दादांनी नेहमीच सत्तेपेक्षा पक्षनिष्ठेला आणि विचारांना प्रथम प्राधान्य देण्याचं काम केलं. पावरसाहेबांच्या आणि अजितदादांच्या शब्दाला आयुष्यात विशेष महत्वाच अस स्थान त्यांनी दिलं आणि ते कायमस्वरूपी असेल.

राजकारणात वाटचाल करत असताना त्यांनी अनेक माणसं कमविली. कोणत्याही कारणाने आपल्याजवळ येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देतात आणि त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांसोबत संबंध ठेवण्याची शिकवण त्यांनी आम्हाला दिली.

आपल्या आयुष्यात सर्वसामान्य लोकांना महत्वपूर्ण असे स्थान त्यांनी दिले. दादांबद्दल लिहायला खूप आहे पण मी इतकंच सांगेल ‘दादा आणि माझं नातं वडील मुलाप्रमाणे नसून एखाद्या जिवलग मित्राप्रमाने आहे जिथं चेष्टा-मस्करी आणि मार्गदर्शन याला मोठा वाव आहे.

पुन्हा एकदा दादा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..💐🎂 अजिंक्यराणा पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य….

ग्लोबल न्युज नेटवर्क: