सहाव्या टप्प्यातील 59 जागांसाठी मतदानाला सुरुवात,दिगग्ज आहेत मैदानात

दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील ५९ जागांसाठी मतदानाला रविवारी सकाळी सुरुवात झाली. सात राज्यांतील १०.१७ कोटी मतदार या निवडणुकीत आपले उमेदवार निवडणार आहेत. एकूण ९७९ उमेदवार यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सहाव्या टप्प्यातील मतदानाअखेर लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ४८३ जागांवरील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. सर्व जागांची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. देशाची राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागांसाठी रविवारीच मतदान होते आहे.

चर्चेतील उमेदवार कोण?
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित उत्तर पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवित आहेत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह भोपाळमधून तर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा सोनीपतमधून तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आझमगढमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, नरेंद्र सिंह तोमर आणि हर्षवर्धन यांचेही भवितव्य आजच मतदान यंत्रामध्ये बंद होईल.

एकूण मतदाता : १०,१७,८२,४७२
पुरुष : ५,४२,६०,९६५ 
महिला : ४,७५,१८,२२६ 
तृतीयपंथी : ३,२८१ 
एकूण मतदान केंद्र : १,१३,१६७ 
एकूण उमेदवार : ९७९

admin: