सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही-आदित्य ठाकरे

बीड | मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. जो कर्जमुक्त असेल, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त सुशिक्षित आणि सुरक्षित असेल. शेतकरी बांधवानो आशीर्वाद देणार की नाही असे अवाहन करत तुमचा आशीर्वादच नवा महाराष्ट्र घडवील. सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही. असे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. बीडमध्ये जनआशीर्वाद यात्रेप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेने आज बीड जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी माजलगांव तालुक्यातील गंगामसला येथे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी टाळ आणि टोपी देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी आदित्य ठाकरे हे वारकऱ्यांच्या वेशात दिसले. सरसकट कर्ज मुक्ती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कर्ज माफीचा विषय मोठा आहे. काही लोकांना कर्ज माफीचे प्रमाणपत्र मिळाले पण प्रत्यक्षात कर्ज माफी झाली नाही. त्यांना कर्ज माफ होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

भावी मुख्यंमत्री आदित्य ठाकरे अशा घोषणाना प्रतिउत्तर देतांना म्हणाले की, जे काय मिळवायचं ते मिळेल. मला मात्र तुमची सेवा करायची आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव मिळत राहावं. महाराष्ट्रात बऱ्याच समस्या आहेत, शेतकरी मला भेटून त्यांची निवेदने देत आहेत यात कर्जमुक्ती, पीक विमा, अडचणी सांगत आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. तो विश्वास मी कायम ठेवेल. तसेच जनआशीर्वाद यात्रा ही मत मागण्यासाठी नाही. तर आशीर्वाद आणि प्रेम मागण्यासाठी असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: