सचिन वायकुळे लिखित ‘ भाषण कला’ पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन
प्रतिनिधी
बार्शी, दि.१० – येत्या गुरुवारी सचिन वायकुळे लिखित ‘ भाषण कला’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. संत तुकाराम सभागृहात सकाळी १० वाजता हा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे.
भाषणासाठी आवश्यक माहिती आणि सूत्रे वायकुळे यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर ठेवली आहेत. ह.भ.प. ऍड जयवंत बोधले महाराज यांच्या हस्ते तसेच आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
माजी मंत्री ऍड. दिलीप सोपलही शुभेच्छा देण्यासाठी यावेळी उपस्थित राहणार आहेत. श्री. शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव अध्यक्षस्थानी असणार आहेत. नगराध्यक्ष ऍड. असिफ तांबोळी, प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात, जयकुमार शितोळे, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले या मान्यवरांची उपस्थित राहणार आहेत.