मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जात आहे. त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ठाकरे सरकारची ही पहिली अग्निपरीक्षा आहे.
अशातच यावेळी भाजप आमदारांचा अखेर सभात्याग केला, विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन बेकायदा, मागचं अधिवेशन राष्ट्रगीताने संपलं, नव्या अधिवेशनासाठी राज्यपालांचा समन्स आवश्यक, शिवाय मंत्र्यांचा शपथविधी अवैध, कुणी बाळासाहेबांचं नाव घेतलं, कुणी सोनियांचं, कुणी पवारांचं नाव घेतलं, सर्वांची शपथ अवैध असल्याचे मत मांडले.
तर दुसरीकडे विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सुरुवात झाली आहे, ठरावाच्या बाजूने असणाऱ्या आमदारांची मोजणी, 16 व्या क्रमांकावरील आव्हाड म्हणाले 20, तर 24 व्या क्रमांकावरील आदित्य ठाकरेंनी नाव सांगितलं – आदित्य रश्मी उद्धव ठाकरे