संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे पंढरपूर कडे प्रस्थान

सासवड: आज रविवार दि.30 जून  जेष्ठ वद्य द्वादशीला संत सोपानकाकांच्या पालखीचे सासवड येथून पंढरपूर कडे  प्रस्थान केले.

माझ्या वडिलांची मिराशी गा देवा | तुझी चरणसेवा पांडुरंगा ||

उपास पारणे राखिला दारवंटा | केला भोगवटा आम्हालागी ||

वंशपरंपरा दास मी अंकित | तुका मोकलिता लाज कोणा ||

हा अभंग झाल्यावर मानकरी केंजळे बंधूंनी पादुका आणून पालखी मधे ठेवल्या. त्या आधी पादुकांना औक्षण करण्यात आले. नंतर देवस्थान व सोपानकाका सहकारी बॅंकेतर्फे दिंडिकरी व मानक-यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालखी देऊळवाड्यास प्रदक्षिणा करून देवखाबाहेर आली.

शुक्रवार, दि. २८ जून २०१९ रोजी संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी सासवड मुक्कामी आली. आज माउलींची पालखी जेजुरीला मार्गस्थ झाली. त्या आधी संत सोपानकाका समाधी संस्थान तर्फे माउलींना नैवेद्य दाखवण्यात आला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: