संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन काय म्हणाले आशिष शेलार

मुंबई । भाजपची आज संघटनात्मक तयारीची महत्वाची बैठक आहे. 90 हजार बूथवर संघटन मजबूत करणे या विषयावर आज देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे आमदार, खासदारांना मार्गदर्शन करतील अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली. तसेच संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण वय वाढतं तशी परिपक्वता वाढावी असा आशिष शेलार यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

संजय राऊतांनी मोदीजींबद्दल प्रेम व्यक्त केलं, त्यांचं प्रेम स्वार्थी की निस्वार्थी हे जनतेला माहित आहे. अमित शाह आणि मोदीजी संजय राऊत यांना समजण्यासाठी अजून बराच काळ लागेल, अशी खरमरीत टीका यावेळी आशिष शेलार यांनी केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: