बार्शी : देशात अकरा कोटी पेक्षा जास्त सदस्य नोंदणी करून शिस्तबध्द संघटनात्मक बांधणीमुळेच भारतीय जनता पार्टीला केंद्रात दुसº या वेळेस सत्तारूढ होता आले. आता विधानसभेच्या निवडणूकीसाठी भाजयुमो च्या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख नवमतदार नोंदणी अभियान यशस्वी करावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड़ गजानन भाकरे यांनी केले. भाजयुमोच्या वतीने शहर संपर्क कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस दिपक चव्हाण, नवमतदार नोंदणी अभियान जिल्हा प्रभारी अजय जाधव, तालुकाध् यक्ष बिभीषन पाटील, शहराध्यक्ष अश्विन गाढवे, भाजयुमो तालुकाध्यक्ष नाना पाटील, शहराध्यक्ष महेदिमियॉ लांडगे आदी उपस्थित होते. प्र्रास्ताविकामध्ये भाजयुमो शहराध्यक्ष महेदिमियॉ लांडगे यांनी तालुक्यात भाजयुमोच्या माध्यमातून युवकांचे संघटन वाढीसाठी होणाº या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी तालुकाध्यक्ष बिभीषन पाटील यांनी भाजपाने आजपर्यंत निष्ठावंताना न् याय दिला असून युवा कार्यकर्त्यांनी पक्षासाठी झोकुन देवुन काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हासरचिटणीस दिपक चव्हाण यांनी १ जुलै ते १ आॅगस्ट यादरम्यान जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी भाजयुमोच्याा कार्यकर्त्यांनी करावी बुथनिहाय काम करावे. प्रत्येक महाविद्यालयात एक नोंदणी प्रमुख नेमावा तसेच शहरात व पंचायत समिती गण आणि गटनिहाय नोंदणी प्रमुख नेमावेत अशा सुचना केल्या.
यावेळी जिल्हाध् यक्ष भाकरे यांनी भाजपात प्रत्येक कार्यकत्याचे कार्याचे मुल्यमापन होत असते. आगामी विधानसभा निवडणाूकीसाठी युवक कार्यकर्त्यांनी पक्षकार्यास वेळ द्यावा. युवक कार्यकर्त्यांंच्या योगदानाचा पक्षाला कधीही विसर पडणार नाही असे सांगितले. यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध् यक्ष राजेश पवार, विस्तारक बाबा शेख, शहर सरचिटणीस बापू कदम, रवि सांगोळे, मोहन गर्जे, रामेश्वर स्वामी, अविनाश शिंदे, विष्णु पवार, दिलदार तांबोळी, अमोल ओव्हाळ, शरीफ शेख, समीर सय् यद, संभाजी आगलावे, नागनाथ मिरगणे, जोतीराम शेळके, समाधान झगझाप, आनंद चाबुस्वार, ज्ञानेश्वर आगलावे, प्रमोद सुरवसे आदी उपस्थित होते.