शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाल्याचा आनंद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र रविवारी सकाळी तो अर्ज मागे घेण्यात आला. आज विधीमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू आहे. नाना पटोलेंनी आपला कार्यभार स्वीकारला आहे. यावेळी सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोले यांचे अभिनंदन केले आहे. शेतकऱ्याचा पुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आपल्याला आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

सभागृहात आज मंत्र्यांची भाषणे सुरू आहे. सर्वात पहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले ही सभागृहाचा नेता म्हणून सभागृहाच्यावतीने मी नाना पटोलेंचे स्वागत करतो. विधानसभा हे राज्याचे सर्वोच्च सभागृह आहे. याचे कामकाज तुम्ही चांगल्यापद्धतीने पार पाडाल ही अपेक्षा व्यक्त करतो. आपला स्वभाव बंडखोर स्वरुपाचा आहे. तसेच अन्याय सहन न करणारा आहे. आपले मत मांडताना कोणाचीही भीती न बाळगणारा महाराष्ट्राचा हा सुपुत्र अध्यक्षदी विराजमान झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासोबतच सभागृहातील सर्वच आमदारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: