शिवभोजन थाळीचा एक कोटीहून अधिक लोकांना आधार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

शिवभोजन थाळीचा एक कोटीहून अधिक लोकांना आधार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 
ग्लोबल न्यूज: गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात  “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. दिनांक २६ जानेवारी २०२० पासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचे वितरण झाले आहे.

आतापर्यंत या  योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा  दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत ८४८ केंद्रे कार्यरत असून योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.  

महिनानिहाय  थाळ्यांचे वितरण

जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ०३१, एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४० आणि जुन महिन्यात २९ जून पर्यंत २९ लाख ९१ हजार ७५५ शिवभोजन थाळ्यांचे वितरण राज्यात झाले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: