शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीची भूमिका अनुकूल

मुंबई । राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडत आहेत. भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्याने शिवसेनेला आज संध्याकाळी साडेसात पर्यंत सरकार स्थापण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी पाठिंब्याची जमवाजमव सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सर्वांत मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे. ती म्हणजे, खुद्द शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन शिवसेनेला सरकार स्थापन करण्यास पाठिंबा द्यावा अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.

ही भेट वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये पार पडली. यावेळी शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही उपस्थित होते. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीची भूमिका अनुकूल आहे असल्याचे सुत्रांकडून समजते आहे

उद्धव ठाकरेंनी अनेक भाषणांमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार चुलते-पुतण्यांवर अनेकदा जहरी टीका केली आहे. मात्र, राजकारणात कोणीच कोणाचा फारकाळ शत्रू किंवा मित्र नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काल भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेस सत्तास्थापनेसाठी पाचारण केले आहे. शिवसेनेला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आघाडीचा पाठिंबा अनिवार्य आहे. त्यामुळे पाठिंबा दिल्यास तो कसा असेल आणि मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचीच चर्चा रंगली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: