जाणून घ्या; शरद पवारांनी गेवराई चे तिकीट जाहीर केलेले विजयसिंह पंडित नेमके कोण आहेत ते…

विधानसभा निवडणुकीतही विजयसिंह पंडित
विजयाची परंपरा राखणार

माजीमंत्री शिवाजीराव  पंडित यांचा वारसा आणि माजी आ.अमरसिंह पंडित यांचे कुशल मार्गदर्शन ही शिदोरी घेऊन गेवराई चे युवा नेते  विजयसिंह पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. 

तरुण, उमदा आणि चारित्र्यसंपन्न असलेला चेहरा म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आजवरच्या राजकीय कारकिर्दीत एकही निवडणुक पराभूत न झालेले विजयसिंह पंडित विधानसभा निवडणुकीतही विजयाची परंपरा कायम राखणार असे त्यांचे समर्थक ठासून सांगत आहेत.

दांडगा जनसंपर्क, तरुणांचे मजबुत संघटन विजयसिंह पंडित यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत विरोधकांना त्यांनी कधीच टिकेची संधी दिली नाही, स्वच्छ प्रतिमेचा हा तरुण चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार असणार आहे.

सन २००४ मध्ये विजयसिंह पंडित यांनी युवा मंचच्या माध्यमातून गेवराई विधानसभा मतदार संघात गाव तेथे शाखा हा उपक्रम राबवून युवकांची मजबुत फळी तयार केली,  ग्रामीण तरुणांशी त्यांचा नित्याचा संपर्क, आपलेपणा आणि सुसंवाद अतिशय बोलका आहे, विजयसिंह पंडित यांच्या बोलण्यात आणि वागण्यात असलेला आपुलकीचा भाव ग्रामीण युवकांना आकर्षित करत आहे.

त्यामुळेच भावी आमदार म्हणून त्यांची प्रतिमा ग्रामीण युवकांनी गावागावात आणि घराघरात निर्माण केली आहे. खा.शरद पवार आणि आ.अजितदादा पवार यांनी अतिशय तरुण वयात त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती, अतिशय बदनाम आणि बेलगाम झालेल्या या संस्थेची सुत्रे हाती घेतल्याने विजयसिंह पंडित यांनी प्रशासनावर आपला वचक निर्माण करून ही संस्था सुरळीत करून तिला प्रतिष्ठा मिळवून दिली, या माध्यमातून त्यांनी नेत्यांचा विश्‍वास सार्थ केला.

प्रशासनाचा सखोल अभ्यास करून त्यांनी कधी कठोर तर तितकेच मृदु होऊन बीड जिल्हा परिषदेला नवा चेहरा देण्याचे काम केले होते. त्याचाच परिणाम म्हणून पक्ष श्रेष्ठीने सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी विजयसिंह पंडित यांना पक्षाची उमेदवारी दिली आहे.

पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव विजयसिंह पंडित यांना आहे. त्यांनी गेवराई पंचायत समितीचे सभापती आणि बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून अतिशय यशस्वीपणे काम केले. त्याचबरोबर त्यांनी बीड जिल्हा परिषदेत विरोधी बाकावर बसून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली.

अतिशय अभ्यासु सदस्य म्हणून त्यांची ओळख जिल्हाभर आहे. दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून काम केले. जिल्हाभरात विकास कामे करताना गेवराई विधानसभा मतदार संघासाठी सढळ हाताने निधी उपलब्ध केला. बंजारा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.

अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍न, आरोग्य सेविकांची पदोन्नती यांसह विविध प्रश्‍न सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जिल्हाभरात एक नवीन पायंडा निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे शिवजन्मोत्सवात रुपांतर करण्याचे श्रेय केवळ विजयसिंह पंडित यांना जाते.

डॉल्बी डिजिटलच्या तालावर थिरकणारी मद्यधुंद तरुणाई असे चित्र पुर्वी जयंतीच्या निमित्ताने दिसत होते, ते बंद करण्याचे काम विजयसिंह पंडित यांनी केले. बीड शहरात भव्य नेत्रदिपक शिवजन्मोत्सव साजरा करताना त्यांनी एैतिहासिक महानाट्याचे दर्शन शिवप्रेमींना घडविले.

मागील दोन वर्षांपासून गेवराई शहरात एैतिहासिक महानाट्याच्या निमित्ताने इतिहास जिवंत करण्याचे काम केले, अतिशय शिस्तबध्द आणि नेत्रदिपक जिवंत देखाव्यांसह मिरवणुकीचे आयोजन केले. पहिल्यांदाच गेवराई मध्ये महिलांना या निमित्ताने सन्मान देऊन त्यांच्यासह लहान मुलांचा सहभाग शिवजन्मोत्सवात करण्यासाठी रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवातही विजयसिंह पंडित यांनी सक्रीय सहभाग घेऊन महामानवांच्या जयंती साजरी करणारा स्वतःचा ठसा उमटविला. त्याला तरुणांनी प्रचंड प्रतिसाद देऊन अक्षरशः विजयसिंह पंडित यांना डोक्यावर घेतले.

विजयसिंह पंडित यांनी आपल्या जनसंपर्काने विरोधकांची पळता भुई थोडी केली आहे, एकीकडे केवळ पंडित या नावाला मोघम शिव्या देऊन लाटेवर स्वार झाल्यामुळे मिळालेल्या आमदारकीतून विकास कामे करताना आलेले अपयश तर दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात असतानाही ग्रामीण भागात विकासाची कामे करण्यास आलेले अपयश यामुळे त्यांचे दोन्ही विरोधक मतदारांच्या मनातून उतरले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.

मतदारांनी विजयसिंह पंडित या स्वच्छ प्रतिमेच्या तरुणाला निवडून देण्याचा निश्‍चय केल्याचे चित्र गेवराई विधानसभा मतदार संघात दिसून येत आहे. संपुर्ण राजकीय कारकिर्दीत पराभव न पाहिेलेला हा अजात शत्रु तरुण आपल्या विजयाची घोडदौड विधानसभेतही कायम ठेवणार असा ठाम विश्वास त्यांना आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: