शरद पवारांचा अमित शहांना ‘पॉवर’बाज टोला…म्हणाले…

शरद पवारांचा अमित शहांना ‘पॉवर’बाज टोला…

शरद पवारांनी काय केले हे म्हणण्याचा तुरुंगात गेलेल्यांना काय अधिकार..?

सोलापूर: शरद पवारांनी काय केले हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे मात्र जे कुणी तुरुंगात गेले त्यांना शरद पवारांनी काय केले असे म्हणण्याचा अधिकार नाही असा ‘पॉवर’बाज टोला शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लगावला.महाजानदेश यात्रेच्या सामोरोपवेळी अमित शहा यांनी शरद पवार यांच्याबद्दल उद्गार काढले होते त्याला पवार यांनी आज सणसणीत चपराक दिली.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोलापुरात आल्यानंतर शरद पवार यांनी चार हुतात्म्यांना अभिवाद करुन रॅलीत सहभागी झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केलं.

शरद पवार म्हणाले माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून झाली. 1965 साली राज्यातील तरुणांचं नेतृत्त्व माझ्याकडं होतं. तेव्हा सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझाकडे होती. सोलापूर जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे.

स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्विकारणाऱ्या नेत्याला लोक जागा दाखवतात.मोहिते पाटील, दिलीप सोपलांवर नाव न घेता टीका केली.गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता. गेलेले नेत इतिहास जमा होणार आहेत. गेलेल्याची चर्चा बंद करा येणाऱ्याची चर्चा करा. भलत्याच्या दारात जाण्याची सुभेदारी ज्यांनी घेतली त्यांना जनता जागा दाखवेल. विधानसभेनंतर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असेल.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी फक्त सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेस विजयी झाली होती.यश कशासाठी? सबंध राज्य आणि देशात वेगळे चित्र आहे. सोलापूर जिल्हा कामगारांचा, शेतकऱ्यांचा जिल्हा होता. शेतकरी आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील लोकांची अवस्था काय होत असेल?

शरद पवारांनी सांगितला किल्लारी भुकंपाचा प्रसंग.

मुख्यमंत्री असताना सकाळी 7वा किल्लारीत होतो.आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने करतात आणि अर्धा तासात गायब होतात. राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्कामी करुन राहावं लागतं. कारण, त्याशिवाय यंत्रणा हालत नाही.

मी काय म्हातारा झालो? अजून लय जणांना घरी पाठवायचं आहे. ते कशाच्या जोरावर पाठवायचे? येथे उपस्थित तरुणाईच्या जोरावर पाठवायचं आहे. मला काही लोकांच्याकडे बघायचं आहे असेही शरद पवार म्हणाले.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: