औरंगजेब व निजामाच्या विचारसरणीचा खासदार म्हणून कार्यक्रमाला आले नसेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो:उद्धव ठाकरेंची खासदार जलील यांच्यावर टीका

खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन
वृत्तसंकलन : गुरुराज माशाळ

पाकिस्तान : देश-विदेशातील नेत्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात असताना पाकिस्तानी मंत्री यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसेन यांनी पातळी सोडून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यानंतर पाकिस्तानी जनतेनेच त्यांची धुलाई केली आहे. आजचा दिवस आपल्याला गर्भनिरोधक महत्त्व सांगतो असे वादग्रस्त पाकिस्तानी मंत्री फवाद हुसेन यांने केले आहे.

उत्तर प्रदेश : राजस्थानमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बहुजन समाज पक्षाचे सर्वच्या सर्व सहा आमदारांनी सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजेंद्र गूढा, जोगेंद्रसिंह अवाना, वाजीब अली, लाखन सिंह मिणा, संदीप यादव आणि दीपचंद खेरीया अशी या सहा आमदारांचे नावे आहेत. आपल्या आपल्या आमदारांची पक्ष बदल पाहून मायावती यांनी आकांडतांडव केला असून काँग्रेसवर टीका केली आहे. समर्थन देणाऱ्या पक्षांच्या काँग्रेस नेहमी शब्दात मायावती यांनी काँग्रेसचे वाभाडे काढले.

भोपाळ: वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची जीव पुन्हा एकदा घसरली आहे भोपाळ येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे संतापजनक असे वक्तव्य केले आहे बलात्कार केले जात आहेत मंदिरामध्ये बलात्कार होत आहेत हा आपला धर्म आहे असा सवाल त्यांनी केला त्यांच्या अशा प्रश्नामुळे हिंदू समाजात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

मुंबई : मराठवाडा मुक्तीसंग्रमाच्या कार्यक्रमाला तेथील खासदार उपस्थित नव्हते. त्यांचा धर्म बघून त्यांना निवडून दिलं का? मुसलमान म्हणून निवडून आले हे आम्ही स्वीकारू. मात्र, औरंगजेबाच्या, निजामाच्या विचारसरणीचा खासदार म्हणून कार्यक्रमाला आले नसेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो, अशी जळजळीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केली.

सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात महाजनादेश यात्रेद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. काल मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कणकवलीत होती. त्यावेळी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणेंनी महाजनादेश यात्रेचे स्वागत केले. तसेच मी लवकरच भाजपवासी होणार आहे, असे नारायण राणेंनी यावेळी म्हणाले. माझा भाजपमधील प्रवेश हा मुंबईत व्हावा, अशी इच्छा मी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसात माझा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे नारायण राणे म्हणाले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस हा बाप-लेकापुरता शिल्लक राहिलेला पक्ष आहे. गेल्या 20 वर्षात शरद पवारांनी महाराष्ट्रात फोडफोडीचे राजकारण केले. त्यामुळे त्यांना टीका करायचा आधिकार नाही, असा टोला भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी लगावला आहे. ते राजगुरुनगर येथे भाजप विजय संकल्प बुथ मेळाव्यात बोलत होते. तुम्हाला जर तुमची माणसे सांभाळता येत नसतील, तर त्याची कारणे तुम्ही शोधा, आम्हाला दोष देऊ नका, असा सल्ला भाजप भांडारी यांनी दिला आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला धक्कावर धक्के बसत आहेत. आता राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष जालींदर कामठे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आघाडीच्या जागावाटपात काँग्रसचे नेते संजय जगताप यांना पुरंदर विधानसभा मतदारसंघात तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामठे पक्षावर नाराज आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

सातारा : संपूर्ण देश हा भाजपमय झाला असून महाराष्ट्रही भाजपमय होत आहे. मी दरवेळी जेवढा आकडा सांगतो तेवढ्या जागा निवडून येतात. यावेळी मी सांगतो की, २८८ पैकी त्यांच्या ४० जागाही निवडूण येणार नाहीत. असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. कै. लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर जलसिंचन योजेनेद्वारे आंधळी धरणातून माण तालुक्याच्या उत्तर भागातील 32 गावांना पाणी देण्याच्या कामांचे भूमिपूजन केल्यानंतर दहीवडी येथे आयोजित भाजपच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेल्या नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल मंगळवारी चांगलेच बरसले. त्यांच्यावर टीका करत असताना पवारांचा तोल सुटला व तुम्हाला कुठे जायचेय तिथे जावा आणि झक मारा, अशी टीका पवारांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर केली आहे. डॉ. पद्मसिंह पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर पवारांनी प्रथम राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव घेता सदर वक्तव्य केले.

जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेत युती होईल असा ठाम विश्वास राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज जळगाव येथे व्यक्त केला केला आहे. ‘तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार…अशा शब्दांत त्यांनी भाजप शिवसेनेतील युतीचे अप्रत्यक्ष संकेत दिले. रावेर – यावल विधानसभा मतदार संघातील सावदा येथे आयोजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांनी युतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपले मत मांडले.

सोलापूर : सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे वडील श्री सिद्रामप्पा मल्लीकार्जून देशमुख यांचे वयाच्या 89व्या वर्षी काल रात्री 8.45 वाजता अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुले, 2 मुली, जावई, नातवंडे, परतुनडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि.18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जुना एप्लाँयमेन्ट चौक दंडवते महाराज मठा समोरील राहत्या घरापासून निघणार असून देगांव येथिल शेतात त्याच्यांवर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी आशा सेविकांच्या आंदोलनस्थळी भेटदेत आपला जाहीर पाठिंबा दिला. सोलापुरात अंगणवाडी आशा सेविका, गटप्रवर्तकांचे मागील सोळा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शासनाने मंजूर केलेल्या मानधनवाडीचा जीआर काढावा केवळ हेच मागणी अंगणवाडी आशा सेविकांचे आहे. पंधरा दिवसांमध्य या सेविकांनी अनेक आंदोलने केली, उपोषणे केली, परंतु सरकारने अद्याप यावर तोडगा काढलेला दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देत आपला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करताना दुतोंडी सरकार असल्याचा आरोप केला.

सोलापूर :भाजप जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार यांनी दळभद्री, दरिद्री, लांडगे अशा शिवराळ भाषेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर लाखोली वाहिली. शिरापूर उपसा सिंचन योजने अंतर्गत रानमसाले वितरका या कामाचा शुभारंभ मंगळवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमास सहकार मंत्र्यांनी भाषण नाही. मात्र त्यांचे कसर जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी भरून काढली. जिल्हाध्यक्ष शहाजी यांनी उपसा सिंचन योजनेवरून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले धारेवर धरलं. त्यानंतर शरद पवार यांनाही सोडले नाही जाणता राजा आजपर्यंत काय केले असा प्रश्न उपस्थित करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दळभद्री, दरिद्री, लांडगे अशा भाषेत लाखोली वाहिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: