शंकरराव मोहिते यांनी साखर कारखानदारी करताना माझे भाऊ अप्पासाहेब पवार यानी हातभार लावला-शरद पवार

नातेपुते: लक्ष्मण जगताप आमच्या सोबत होता. आमदार झाला पक्ष सोडला नंतर भाजपात गेले. एकदा त्यांचा फोटो आर एस एस च्या पोस्टरवर हाफ पँट, काळी टोपी घातलेला आला जगतापाची ही अवस्था झाली.आता मला ही काळजी आहे की, विजयदादाना हाफ पँट, काळी टोपी घातलेल पहायची वेळ येऊ नये. राष्ट्रवादी सोडली नाही म्हणता, पण कुठल्या ही पक्षात जा , पण हाफ पँट घालू नका. माझी विनंती आहे.विजयदादानी या वयात पाय आणि उघड्या मांड्या बघायची वेळ जनतेवर आणि माझ्यावर आणू नये. अशा शब्दात पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वर घणाघाती टीका केली.

माढा लोकसभा राष्ट्रवादी उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा नातेपुते ता. माळशिरस येथे आज शुक्रवारी पार पडली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,

माळशिरस मध्ये बोलण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. विजयदादाचा साखर धंद्याचा संबध होता का नव्हता..? असे सांगत पवार पुढे म्हणाले , सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांनी साखर कारखानदारी करताना माझे भाऊ अप्पासाहेब पवार यानी हातभार लावला. मोहितेना मदत केली. जुन्या सहकाऱ्या बद्दल मी वाईट बोलत नाही. मोहिते यांच्या पतसंस्थातेतील लोकांचे पैशे बुडले ते लोक माझ्याकडे आले. पण मी व्यक्तिगत आकस करत नाही. आता मी माळशिरस तालुक्याची जबाबदारी घेतली आहे. असे म्हणत शरद पवार यांनी मोहिते यांना आव्हान दिले आहे.

स्थिरीकरणासाठी भाजपात गेलो असे मोहिते पाटील सांगतात . मी यांना काय काय दिल हे आठवतोय. बांधकाम मंत्री, ग्रामविकास खात दिल, उपमुख्यमंत्री पद दिल. अजित पवार याना डावलून विजयदादाना उपमुख्यमंत्री केले . अशा अनेकदा संधी दिल्या, मागच्या लोकसभा निवडणुकीत विजयदादा ना खासदार केल. एवढ सगळे दिल्यानंतर स्थिरीकरण सुचल मग मोहिते पाटील एवढ्या सगळ्या सत्तेत इतकी वर्ष असताना का स्थिरीकरण डोक्यात आले नाही..? यांचा अंदर का मामला दुसरा आहे, स्थिरीकरण फक्त दाखवण्यासाठी. अशी तुफान टीका आज शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वर केली.

admin: