विरोधकांचे काम गारुड्यासारखं भाऊसाहेब आंधळकर ,शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा बार्शीत शुभारंभ
बार्शी: विरोधकांचे काम गारुड्या सारखे आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. बार्शीत माणसं पळवणारी टोळी आल्याची परिस्थिती दिसत आहे. दिलीप सोपल यांचं काम करतो म्हणून कामगाराला मारहाण. शेतकऱ्यांना उध्वस्त काम करणारे ट्रॅकटर घेऊन प्रचार करतायत अशी टीका स्थानिक शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केली
बार्शी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुती चे उमेदवार दिलीप सोपल यांच्या बार्शी शहरातील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी नंदकुमार काशीद, बंडू माने, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, जि. प. सदस्य श्रीमंत थोरात, पंचायत समितीचे गटनेते सुंदरराव जगदाळे, सुधीर काळे,मकरंद निंबाळकर, आबा पवार,विलास रेणके, दगडू मांगडे,मंगल पाटील, नागजी नान्नजकर,पिंटू माळगे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आंधळकर म्हणाले,मी स्वतः सोपल साहेबांची शेतकऱ्यांबद्दल असलेली सहानभूती पाहिली आहे. मतांसाठी कोणीही जातीचे राजकारण करू नये. गेल्यावेळी आम्ही तुमच्यासोबत होतो तेव्हा जात दिसली नाही का. आताच आमची जात कशी दिसते असा सवाल करत प्रचार करताना नीती पाळणे गरजेचं आहे. दिलीप सोपल यांची सावली म्हणून अर्जुनराव बरबोले राहत होते. आज बारबोले यांचे मालकपण राहिलेले नाही. कृष्णराज बारबोले यांना नामधारी उपनगराध्यक्ष पद दिले आहे. शिवसेनेचे तालुक्यातील 25 हजार मताधिक्य वाढले असल्याचेही आंधळकर यावेळी म्हणाले.
पोपट डमरे म्हणाले,तालुक्यात शिवसेनेची 25 हजार मत आहेत. पुढील दहा दिवस गाफील न राहता काम करायचं.. विरोधकांनी भगवंत नगरीचे वाटोळे केले. शहरात फिरण्याची सोय नागरिकांना राहिलेली नाही. समोरच्या उमेदवाराला कमी न समजता दिलीप सोपल यांना मोठ्या मताने विजयी करायचं आहे असे आवाहन माजी जिप सदस्य पोपट डमरे यांनी केले.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi