विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी फक्त एवढे दिवस, असा आहे निवडणूक कार्यक्रम
त्यामुळं उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 12 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
मुंबई | विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पाहता यंदा प्रचारासाठी उमेदवारांना अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. एकाच दिवशी संपूर्ण राज्यात मतमोजणी होणार असल्यानं पक्षांच्या स्टार प्रचारकांचीही चांगलीच दमछाक होणार आहे.
सात ऑक्टोबर रोजी उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असल्यानं प्रत्यक्ष किती आणि कोण-कोणते उमेदवार मैदानात असतील हे त्याच दिवशी स्पष्ट होईल. त्या नंतर आठ ऑक्टोबर पासून खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरूवात होणार आहे.
तर 19 ऑक्टोबर रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस असेल. त्यामुळं उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 12 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. म्हणजेच या बारा दिवसात उमेदवाराला अवघा मतदार संघ पिंजून काढावा लागणार आहे.
- असा आहे निवडणूक कार्यक्रम –
27 सप्टेंबर 2019 शुक्रवार फॉर्म भरण्यास सुरुवात पहिला दिवस
28 सप्टेंबर 2019 शनिवार फॉर्म भरण्याचा दुसरा दिवस सर्वपित्री अमावस्या
29 सप्टेंबर 2019 रविवार फॉर्म भरण्याचा तिसरा दिवस घटस्थापना
30 सप्टेंबर 2019 सोमवार फॉर्म भरण्याचा चौथा दिवस
1 ऑक्टोबर 2019 मंगळवार फॉर्म भरण्याचा पाचवा दिवस
2 ऑक्टोबर 2019 बुधवार फॉर्म भरण्याचा सहावा दिवस गांधी जयंतीची सुट्टी
3 ऑक्टोबर 2019 गुरूवार फॉर्म भरण्याचा सातवा दिवस
4 ऑक्टोबर 2019 शुक्रवार फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस
5 ऑक्टोबर 2019 शनिवार अर्ज छाननी
6 ऑक्टोबर 2019 रविवार सुट्टी
7 ऑक्टोबर 2019 सोमवार फॉर्म मागे घेण्याची शेवटची तारीख
8 ऑक्टोबर 2019 मंगळवार प्रचाराचा पहिला दिवस
9 ऑक्टोबर 2019 बुधवार प्रचाराचा दुसरा दिवस
10 ऑक्टोबर 2019 गुरूवार प्रचाराचा तिसरा दिवस
11 ऑक्टोबर 2019 शुक्रवार प्रचाराचा चौथा दिवस
12 ऑक्टोबर 2019 शनिवार प्रचाराचा पाचवा दिवस
13 ऑक्टोबर 2019 रविवार प्रचाराचा सहावा दिवस
14 ऑक्टोबर 2019 सोमवार प्रचाराचा सातवा दिवस
15 ऑक्टोबर 2019 मंगळवार प्रचाराचा आठवा दिवस
16 ऑक्टोबर 2019 बुधवार प्रचाराचा नववा दिवस
17 ऑक्टोबर 2019 गुरूवार प्रचाराचा दहावा दिवस
18 ऑक्टोबर 2019 शुक्रवार प्रचाराचा अकरावा दिवस
19 ऑक्टोबर 2019 शनिवार प्रचाराचा शेवटचा बारावा दिवस
20 ऑक्टोबर 2019 रविवार सुट्टी
21 ऑक्टोबर 2019 सोमवार मतदानाची तारीख
22 ऑक्टोबर 2019 मंगळवार
23 ऑक्टोबर 2019 बुधवार
24 ऑक्टोबर 2019 गुरूवार मतमोजणी/निकाल
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.