विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेच्या देणगीत यंदा पावणे सहा लाखांची वाढ

पंढरपूर- उन्हाळ्यात श्रीं ना उष्णतेचा त्रास होवू नये यासाठी पंढरपूर च्या श्री विठ्ठल रूक्मिणी मातेला चंदन उटी लावली जाते. यासाठी पूजा असतात. राज्यभरातून भाविक यासाठी बुकिंग करतात. यंदा यापूजेतून मंदिर समितीला २५ लाख ६२ हजार रूपये देणगी स्वरूपात मिळाले आहेत.

ही रक्कम गतवर्षीच्या तुलनेत पावणे सहा लाख रुपयांनी जास्त आहे.प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजा दि ६-४-२०१९ ते दि. १२-६-२०१९ या कालावधीत संपन्न झाल्या.

त्यामध्ये श्री विठ्ठलाकडे १३८ व श्री रूक्मिणीमातेकडे २४ भाविकांनी सहभाग घेतला. सदर पूजेपासून मंदिर समितीस गतवर्षीच्या तुलनेत रक्कम रू ५,७५०००/- ची वाढ होवून रक्कम रू.२५,६२००० /- इतकी देणगी प्राप्त झाली आहे.

धिरज करळे: