आमची लढाई विधानसभेत भाजप शिवसेने विरोधातच;राजू शेट्टी,खबर जगाची सकाळच्या हेडलाईन

खबर जगाची सकाळच्या हेडलाईन

गुरुराज माशाळ

बीस्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात संवाद झाल्याचा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा.

ओडिशाः मुख्यमंत्री मदत निधीसाठी केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून ३ कोटींचं साहाय्य; धनादेश मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे सुपुर्द.

कोलकाताः डॉक्टर संप प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही; राज्यपाल त्रिपाठी यांची माहिती.

दिल्लीः संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची भेट.

झारखंड : झारखंडमध्ये पुन्हा एकदा मोठा नक्षलवादी हल्ला; सरायकेला खरसावन जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ५ पोलीस शहीद. यात २ उपनिरीक्षक आणि ३ पोलिसांचा समावेश.

मुंबई : 2019 या वर्षासाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर. मराठी भाषेत सुशील कुमार शिंदे या कवीच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहास पुरस्कार. तर सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीस बाल साहित्य पुरस्कार जाहीर.

मुंबई : आपल्याला युतीतच लढायचं आहे, युतीत वाद सुरु असल्याचा प्रचार शरद पवार करत असतील, तर त्याकडे लक्ष देऊ नका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना सूचना.

मुंबई : एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे 20 गुण कमी केल्याप्रकरणी छात्र भारती विद्यार्थी संघटना आक्रमक; संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.

नाशिक : आमची लढाई विधानसभेत भाजप शिवसेने विरोधातच; विधानसभेसाठी आमची 20 ते 25 जागांची तयारी, सगळे सोबत आले तर आम्ही विधानसभेसाठी महा आघाडीसोबत जाणार – राजू शेट्टी

धिरज करळे: