पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोनाच्या लढ्याला 31 हजार रुपयांची मदत,
बार्शीतील युवा प्रतिष्ठानचा उपक्रम.
बार्शी : सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीने ग्रस्त असून भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. संपूर्ण देशात 21 दिवस लोकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बार्शीतील सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या युवा प्रतिष्ठानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. सुशांत चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोनाच्या लढ्याला 31 हजार रुपयांची मदत पंतप्रधान सहायता निधीत करण्यात आली आहे.
शिवछत्रपती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचालित युवा प्रतिष्ठाण प्रत्येक वेळी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढ्यासाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत चव्हाण यांनी स्वतःच्या वाढदिवसा निमित्त अकरा हजार रुपये मदत जाहीर करत शुभेच्छा न देता कोरोना साठी मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिष्ठाणच्या वतीने व सदस्यांनी चांगला प्रतिसाद देत एका दिवसात निधी जमा केला.
युवा प्रतिष्ठानच्या वतीने या पूर्वीही 31 डिसेंबर साजरा न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत, अंध, अपंग विद्यार्थी मदत, एचआयव्ही ग्रस्त मुलांना मदत, जलयुक्त शिवार योजनेसाठी आर्थिक मदत व श्रमदान, वृक्षलागवड असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या कोरोनासाठीच्या मदतीसाठी अध्यक्ष सुशांत चव्हाण यांनी अकरा हजार, शिवजयंती वर्गणी मधील शिल्लक दहा हजार तसेच सदानंद गरड, शिवाजी हाके, पप्पू चव्हाण, ऋषीकेश गव्हाणे, गणेश धनवटे, अभिमान ढगे, सचिन काळे, दयानंद धुमाळ, नितीन तवटे, मोहित मस्तुद, अमोल अडाणे, नारायण केसरे, योगेश नागणे, गणेश वाघमोडे, सुहास वायकुळे, रोहित डोंगळे, अमर गाडे, सुदर्शन हांडे आदींनी मदत केली.
कोरोना विषाणू विरुद्धचा लढा मोठा आहे. आपल्या देशाला आरोग्य, आर्थिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर लढावे लागणार आहे. आम्ही केलेली मदत अगदी नगण्य आहे. पण आमच्या 125 सदस्या पैकी 25 सदस्य आरोग्य व पोलीस यंत्रणांच्या मदतीसाठी तयार आहेत. ज्यांना शक्य त्यांनी या संकटात पंतप्रधान सहायता निधीत आर्थिक मदत करावी. प्रत्येकाने लॉकडाऊनच्या काळात घरात बसून सरकारी सूचनांचे पालन करावे. या संकट काळात घरात बसने व सरकारी सूचनांचे पालन करणे ही देशसेवाच आहे.
अँड.सुशांत चव्हाण, अध्यक्ष युवा प्रतिष्ठान, बार्शी.