वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच लागू होणार हे नवे नियम,आयसीसीची अंमलबजावणी

🎯 आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2015 पासून नवे सात नियम लागू केले आहेत. हे सारे नियम वनडे क्रिकेटमध्ये लागू करण्यात आले आहेत. मात्र वर्ल्डकपमध्ये हे नियम पहिल्यांदाचा लागू केले जाणार आहेत.

🧐 जाणून घ्या सात नियम :

आऊट : हेल्मेटला चेंडू लागून झेल घेतल्यास फलंदाज बाद ठरणार आहे. मात्र, हँडल द बॉल च्या परिस्थितीत फलंदाजाला बाद दिले जाणार नाही.

बॉल बाउन्स – दोनवेळा बाउन्स टाकल्यास तो नो बॉल दिला जाणार आहे. याशिवाय फ्री हिटसुद्धा मिळणार आहे.

बॅटचा आकार निश्चित – फलंदाज आणि गोलंदाजांत समान लढत व्हावी यासाठी बॅटचा आकार निश्चित करण्यात आला आहे. यात बॅटची लांबी 108 मि.मी. जाडी 67 मिमीपेक्षा जास्त नसेल. पंचांना शंका आली तर ते बॅटची लांबी, रुंदी मोजू शकतात.

रनआउट – स्टम्पिंगवेळी बॅट रेषेवर असताना नॉटआउट दिलं जात होतं, मात्र यापुढे बॅट रेषेवर असली तरी बाद दिलं जाणार आहे. जर फलंदाजाचा पाय किंवा बॅट क्रीजमध्ये आणि हवेत असले तरी फलंदाज नॉटआउट असेल.

नो बॉलच्या धावा वेगळ्या खात्यात – जर एखादा गोलंदाज नो बॉल फेकतो तेव्हा लेग बायच्या धावा या नोबॉल म्हणून मोजल्या जात होत्या. यापुढे त्या नोबॉलच्या खात्यात न लिहता वेगळ्या लिहल्या जातील.

गैरवर्तन – एखाद्या खेळाडूचे वर्तन चुकीचे वाटल्यास पंचांना त्या खेळाडूला मैदानातून बाहेर घालवण्याचे अधिकार पंचांना देण्यात आले आहेत.

रिव्ह्यू – फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणारा संघ या दोघांपैकी कोणी डीआरएस घेतला आणि अंपायर्स कॉलमुळे जर पंचांचा निर्णय अंतिम राहिला तर संघाचा रिव्ह्यू वाया जाणार नाही.

📍 वादग्रस्त रनआउट, खेळाडूंची पंचांशी हुज्जत यासारख्या प्रकारांवर आयसीसीने केलेल्या नियमांची अंमलबजावणी या वर्ल्ड कपमध्ये केली जाणार आहे.

admin: