वधू वरांच्या संख्येत असणारी मोठी तफावत ही चिंतेची बाब: खा. रणजितसिंह निंबाळकर

प्रशांत खराडे / धीरज करळे

बार्शी: वधुवरांच्या संख्येत मोठी तफावत निर्माण झाली असून,यामुळे नैसर्गिक तत्व ही बिघडले आहे़ विवाह जमवताना ही शेतकरी मुलांबाबत आता दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे़समाजात हुंडा घेण्याचे प्रमाण कमी होण्याऐजवी वाढले आहे ही बाब चिंतेची आहे़ कांही प्रमाणात शेतकरी देखील लाखा पासून कोटीपर्यंत उत्पन्न घेत आहेत़ शेतकऱ्यांच्या मुलांनीही ही संशोधनात्मक शेती करण्यावर भर दिला पाहिजे अशी अपेक्षा माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.

सकल मराठा समाज बार्शी तालुका व राजाभाऊ राऊत मित्र मंडळाच्या वतीने बार्शी यांच्या वतीने बार्शी येथे आयोजित राज्यस्तरीय
मराठा वधू वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर,माजी आमदार राजेंद्र राऊत ,विश्वास बारबोले , सोलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक दत्ता मुळे, उपसभापती अविनाश मांजरे, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,सोजर उद्योग समुहाचे प्रमुख अरूण बारबोले, संतोष निंबाळकर ,जयकुमार शितोळे उपस्थित होते.

मराठा समाजात ही विवाहासाठी अपेक्षा वाढत चालल्या आहेत़शेतकऱ्यांच्या मुलांची स्थळे टाळली जातात यामुळे शेतकरी कुटुंबात नैराश्य वाढत आहे़ शेतकरी कुटुंबात नौकऱ्या नसल्याने आर्थिक बाजू कमजोर होत आहे़ यामुळे वैवाहीक कटकटी वाढून वितुष्ट येण्याचे प्रमाण ही वाढत आहे़ लग्नातील दिखाऊपणासाठी केला जाणारा खर्च टाळून सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा रुजली पाहिजे असे सांगत मराठा समाजाच्या मुलींसाठी वस्तीगृह शासनाने बांधून देऊन समाजाला हस्तांतरीत करावे़ बाजार समितीकडून अशा प्रकाराचे वस्तीगृह बांधणार असल्याचे माजी आ़ राजेद्र राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

खा ओमराजे निंबाळकर यांनी लग्नावरील खर्च कमी करा़ हुंडा प्रथा थांबवा,मराठा समाजातील मुलांना जास्त मार्क असतानाही प्रवेश मिळत नाहीत म्हणून आत्महत्या होत आहेत ही बाब दुर्देर्वी आहे़ मी खासदा झाल्यानंतर सत्काराला फाटा देत शैक्षणिक साहित्य भेट द्या असे आवाहन केले होते़ मंदीराला तोरण व देवाला बकरे न कापता तो खर्च मुलांच्या शिक्षणावर करा असे आवाह केले़ सर्वांना शिक्षण मोफत करण्यासाठी आम्ही लवकरच मुख्यमंत्र्याना भेटणार असल्याचे सांगितले.

विश्वास बारबोले यांनी मराठा समाज हा इतर समाजाच्या तुलनेत मोठा असून विसाव्या शतकात वाटचाल करीत असताना मराठा समाजापुढे अनंत अडचणींना समारे जावे लागत त्यातील मुलामुलींचे लग्न जमवणे ही एक अडचण असल्याचे सांगत अशा परिचय मेळाव्यामुळे सर्वांची सोय होण्यास मदत होते असे सांगितले.

धिरज करळे: