लोकसभा निवडणूकीत आचारसंहीतेचा भंग , जिल्हा मध्यवर्तीच्या बॅकेच्या तीन कर्मचाऱ्याचे निलंबन बार्शीतील दोघांचा समावेश

बार्शी – गणेश भोळे

लोकसभा निवडणूकीत मतदान केंद्राच्या परिसरात व प्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सोलापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक मर्यादित सोलापूर बॅकेच्या तीन कर्मचारीचे गैरवर्तनाची खातेनिहाय चौकशी होईपर्यंत निलंबनाचे आदेश करण्यात आले आहे निवडणूकीतील सहभागावरून जिल्हा बँकेच्या इतिहासात प्रथम अशा प्रकारची कारवाई झाल्याचे बोलले जात आहे

यात सचिन विलास होनराव लिपीक ऑडीट विभाग (बार्शी ) रा .वैरागकर मठ ऐनापुर रोड बार्शी, प्रभुलिंग विश्वनाथ माळगे लिपीक ( मोहोळ शाखा ) रा.देवणे गल्ली पांडे चौक बार्शी,प्रमोद पुरुषोत्तम भोसले (रिधोरे शाखा) रा . तांदुळवाडी ता . माढा या तिघांना निलंबन करण्यात आले आहे .

पाटील यांच्या आदेशपत्रात म्हटले आहे की, लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करणेबाबत कळविलेले असताना सचिन होनराव हे दि.१८ एप्रिल रोजी बार्शी शहरातील मतदान केंद्राच्या परिसरात मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने बुथवर राजकीय पक्षाच्या स्लिपा देण्याचे कामकाज करत असल्याचे कार्यालयाच्या निदर्शनास आले तर माळगे हे बार्शी शहरातील दि.१८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने कामकाज करत असल्याचे निदर्शनास आले. तर प्रमोद भोसले माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ संबंधित गावामध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये भाषण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. माळगे व होनराव यांनी अप्रत्यक्षरित्या तर भोसले यांनी प्रत्यक्षरित्या लोकसभा निवडणूकीत सहभाग घेवून आचारसंहितेचा भंग केलेला आहे. सदरची बाब ही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारी असून कायदयातील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र आहे. सदरच्या गैरवर्तनाची खातेनिहाय चौकशी होणे आवश्यक आहे. त्याकरिता चौकशी होईपर्यंत तिघांना निलंबीत करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

admin: